सोलापूर - कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीने यंदाच्या वर्षी साजरी होणारी चैत्री यात्रा प्रतिकात्मक व मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मंदिर समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
चैत्री यात्रेसंदर्भात विचारविनियम करण्यासाठी गुरूवारी सकाळी ११ वाजता भक्तनिवास येथे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन स्वरूपात झाली. या बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करिगरी गुरू, किसनगिरी गागा, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरू तसेच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी सुरेश कदम उपस्थित होते.