सोलापूर : मागील अनेक महिन्यांपासून खाद्य तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट आवाक्याबाहेर गेलेले खाद्य तेलात दर कमी झाल्याने स्वयंपाकघराचे बजेट सुधारतांना दिसत आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली कपात आणि दिवाळीनंतर मागणीत झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये सर्व खाद्यतेलाचे भाव प्रतिकिलो १० ते ३५ रुपयांनी कमी झाले आहेत.
शेंगदाणा, सूर्यफूल आणि सरसो तेलाचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीनंतर खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट काही प्रमाणात कमी झाले आहे. पुढील काळात सर्वच खाद्यतेल आणखी ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता असल्याचे मत तेल विक्रेते व्यापाऱ्यांनी सांगितले.
तेलांचा दर (प्रति किलो)
दिवाळीत सध्या
सोयाबीन १६० १४०
शेंगदाणा १६५ १५५
सरसो १६० १४८
सूर्यफूल १९० १६०
पाम १४० १२५
म्हणून झाले स्वस्त
केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली कपात आणि दिवाळीनंतर मागणीत झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले आले आहे. नवीन सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. त्याचाही परिणाम तेलाच्या घसरणीवर झाला आहे.
दर आणखी घसरणार
केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. येणाऱ्या काळात सर्वच खाद्यतेल आणखी ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी सांगितले.
घाणा तेलाच्या मागणीत वाढ
नागरिक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सजग झाल्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाच्या मागणीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिफाइंड तेलापेक्षा घाण्यावरील नैसर्गिक तेल आरोग्यासाठी कायमच लाभदायक आहे. घाण्यात तयार केलेल्या तेलातील नैसर्गिक तत्त्व शरीराला मिळतात, यामुळे घाण्यावर तयार केलेली शेंगतेलास सर्वाधिक मागणी आहे.
पाच जणांच्या कुटुंबाने महिन्याला किती तेल खावे?
एका माणसाने दररोज १५-२० ग्रॅम तेलाचेच सेवन करावे, याप्रमाणे चार व्यक्तींच्या कुटुंबाला महिन्याला दोन किलो तेल पुरेसे ठरते. जर आपण आहारात रिफाइंड २०० ग्रॅम तेल वापरत असाल तर घेण्याचे तेल केवळ ७५ ग्रॅम वापरावे असे आहार तज्ज्ञांचे मत आहे. जेवणात तेलाचा वापर कमी केल्याने पैसे आणि आरोग्य यांची बचत होते.