सोलापूर : वाढती गर्दी व प्रवाशांची मागणी लक्षात घेता मैसूर - सोलापूर - मैसूर गोलगुम्बज एक्सप्रेस गाडीचा पंढरपूर रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीच्या विस्तारामुळे दक्षिण भारतातील भाविकांना मोठा फायदा होणार असून त्यांना ये-जा करण्यासाठी नियमित ट्रेनची सोय होणार आहे. यामुळे प्रवाशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मैसूर - पंढरपूर नियमित गाडी मैसूरहून संध्याकाळी ३.४५ वाजता सुटणार आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता पोहोचणार आहे. पंढरपूर- मैसूर नियमित गाडी पंढरपुरहुन दुपारी १ वाजता सुटणार असून मैसूरला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचणार आहे. तरी सर्व रेल्वे प्रवाशांनी या गाडीचा जास्तीत फायदा घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केेले आहे. सोलापूरहून दक्षिण भारतात जाण्यासाठी अनेक गाड्यांचा पर्याय आहे. दक्षिण भारतातील अनेक प्रवाशांना थेट पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी या विस्ताराचा फायदा होणार आहे.