शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

Good News; नव्या वर्षात रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात होणार मोठा बदल

By appasaheb.patil | Published: December 21, 2020 9:00 AM

दुहेरीकरण, विद्युतीकरणाचा परिणाम; एक्सप्रेस, पॅसेजर व मालगाड्यांच्या ताशी वेग वाढणार

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : लॉकडाऊनकाळात पूर्णत्वास आलेले दुहेरीकरण, विद्युतीकरणाचे काम, पुलांची झालेली डागडुजी व अन्य प्रलंबित  ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यामुळे देशभरातील एक्सप्रेस,  पॅसेजर व  मालगाड्यांचा ताशी वेग ३० ते ४० किमीने वाढणार आहे. शिवाय रेल्वे गाड्यांच्या  वेळापत्रकातही मोठा बदल होणार असून नव्या वेळापत्रकाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून नव्या वर्षात देशभरातील सर्वच रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या वृत्ताला मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी दुजोरा दिला आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यामुळे देशभरातील प्रवासी रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. याचाच फायदा घेत भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रलंबित दुहेरीकरण, विद्युतीकरणासोबत पुलांची डागडुजी, रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. लॉकडाऊनच्या आठ महिन्यात रेल्वेने ९० टक्के प्रलंबित कामे पूर्ण केली आहेत. दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे सिग्नलला गाडी थांबणे, गाड्यांचा ताशी वेग वाढणे, गर्दी नसलेले थांबे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात येत असल्यामुळे रेल्वेचे नवे वेळापत्रक तयार होत आहे, त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून नव्या वर्षापासून देशभरातील सर्वच रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकात निश्चितच बदल होईल असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

-------------

थांब्याची संख्या घटणार

भारतीय रेल्वे मंत्रालयाने नवे वेळापत्रकात बनविताना छोटे छोटे रेल्वे स्टेशनवर गाडी न थांबविण्याचा निर्णय घेणार आहे. ज्या स्टेशनवरून कमी प्रमाणात प्रवासी चढ-उतार करतात, रेल्वेला कमी उत्पन्न मिळते अशा स्टेशनवर गाडी न थांबविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय घेत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरCentral Governmentकेंद्र सरकारrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे