GOOD NEWS; सोलापूर शहरातील निर्बंध सोमवारी किंवा मंगळवारी शिथिल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 05:10 PM2021-08-08T17:10:26+5:302021-08-08T17:10:33+5:30
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आनंद चंदनशिवे यांना दिली माहिती
सोलापूर : पुण्यातील कोरोनाचे नियम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी शिथिल केल्यानंतर सोलापूरचे नियम कधी शिथिल होणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दूरध्वनीवरून संवाद साधला असता सोमवार किंवा मंगळवारी सोलापूर शहरातील निर्बंध शिथिल होतील असे सांगितले.
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांनी महापालिका, जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांकडे केली होती. दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर शहरातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच केली होती. रविवारी शहरातील निर्बंध झाल्याची माहिती समजताच आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून सोलापुरातील निर्बंध कधी शिथिल होतील याबाबत विचारले असता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी किंवा मंगळवारी नक्कीच सोलापूर शहरातील निर्बंध शिथिल होतील असे सांगितले.