शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

Good News: सोलापूर ग्रामीणमध्ये २१ हजार चाचण्यात ९0 टक्के लोक निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 12:12 PM

रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्टच्या २१ हजार चाचण्या पूर्ण; केवळ २ हजार १२0 लोक आढळले बाधीत

ठळक मुद्देग्रामीण भागात अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी ग्रामीण भागात रॅपीड अ‍ॅन्टीजेन किटद्वारे ५0 हजार चाचण्या घेण्याचे आदेश दिले

सोलापूर : जिल्हा आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात रॅपीड अ‍ॅन्टीजेन किटद्वारे चाचण्या घेण्याचा २१ हजाराचा टप्पा पूर्ण केला असून, या मोहीमेत ९0 टक्के लोकांना बाधा झाली नसल्याचे दिसून आले आहे. 

ग्रामीण भागात अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. कोरोना विषाणूच्या संसगार्ची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी ग्रामीण भागात रॅपीड अ‍ॅन्टीजेन किटद्वारे ५0 हजार चाचण्या घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत. त्याप्रमाणे आरोग्य विभागाने तालुकानिहाय मोहीम राबविली आहे. ५ आॅगस्ट रोजी २१ हजार ७९ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या.

यामध्ये १८ हजार ९५९ लोक निगेटीव्ह (८९.९४ टक्के) आले आहेत. तर २ हजार १२0 लोकांचा (केवळ १0.0६ टक्के) अहवाल पॉझीटीव्ह आला  आहे. पंढरपूर, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर तालुक्यातील कोरोना संसगार्ची साखळी तुटेपर्यंत या चाचण्या सुरू राहणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली. --------------------अशा झाल्या रॅपीड अ‍ॅन्टीजेन चाचण्या

  • तालुका          चाचण्या         पॉझीटीव्ह              निगेटीव्ह
  • अक्कलकोट     २९४५            २७५                    २६७0
  • बार्शी             ३२२२            ४४७                    २७७५
  • करमाळा         १४४९            १६२                     १२८७
  • माढा              १२१३             ११८                     १0९५
  • माळशिरस       १२४५              ६४                    ११८१
  • मंगळवेढा         १७३१              ८८                    १६४३
  • मोहोळ            १४0३              ८६                    १३१७
  • उ. सोलापूर       १५७१             २0३                   १३६८
  • पंढरपूर               १२८१             ३0९                   ९७२
  • सांगोला             ११0९             ५६                     १0५३
  • द. सोलापूर         ३९१0           ३१२                     ३५९८
  • एकूण               २१0७९         २१२0                   १८९५९
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल