सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसाच्या कृपेवर सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणारे उजनी धरणाने सोमवारी दुपारी बारा वाजता १०० टक्कयांचा टप्पा पार केला. यामुळे परिसरातील शेतकºयांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़ सोमवारी दुपारी बारा वाजता दौंडचा विसर्ग ३९ हजार ९८१ झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.
उजनी धरणाच्या निर्मितीपासून यंदा १६ वेळा धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरले. गेल्या ३७ वर्षांत अनेकदा ऐन पावसाळ्यात पाणी पातळीने मृतसाठा गाठला, तर अतिवृष्टीमुळे आतापर्यंत आठवेळा उजनी ओव्हरफ्लो झाल्याची उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडे नोंद आहे.
उजनीची स्थिती़...पाणी पातळी = ४९६़८३०एकूण साठा = ३३२०़०३उपयुक्त साठा = १५१७़२२टक्केवारी = १०० टक्केदौड विसर्ग = ३० हजार ९८१ क्युसेसबंडगार्डन विसर्ग = ३१ हजार ७७० क्युसेसबोगदा = १०५० क्युसेसकालवा = २३०० क्युसेसनदी = ५००० क्युसेससिना = माढा = ३५० क्युसेस
उजनीवर जिल्ह्याचे अर्थकारणसोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले आणि त्याबरोबरच साखर कारखान्याच्या उभारणीला वेग आला. केवळ उजनी धरणातील पाण्यावर जिल्ह्याचे अर्थकारण विसंबून राहिले. सध्या जिल्ह्यात ३३ साखर कारखाने उसाचे गाळप करीत असून येत्या हंगामात ही संख्या वाढणार आहे.