‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत मकरसंक्रांत दिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देतो शिवाय तिळाचा स्नेह व गुळाची गोडी बोलण्यात यावी, असं सांगतो़ सर्वांशी गोड बोलावे ही सभ्यता आहे. गोड बोलण्यामुळे खूप काही शिकायलाही मिळते़
झाले असे की, पालवीमध्ये मुलांची काळजी घेणाºया ताईनेच रागाने लहान मुलाला धपाटा मारला़ परंतु तिने त्या मुलाची चूक काय हे समजून घेतले नाही़ तिला ती चूक कळाल्यानंतर मोठी असूनही त्या मुलाला सॉरी म्हणाली़ त्यानंतर थोड्या वेळाने झालेला प्रसंग विसरून दोघेही पुन्हा एकमेकांना गोड बोलू लागले़ यातून एकच संदेश मिळतो की, राग करण्यासाठी कृती समजावून घेतली पाहिजे़ गोड बोलण्याचा परिणाम खूप काही शिकवून जातो़ निराशा दूर होते़ उत्साह वाढवतो़ संतापलेली व्यक्ती स्वत:च्या मनावरील नियंत्रण हरवतो़ याचा स्वत:च्या आरोग्यावर परिणाम होतो़ म्हणून प्रत्येकाने मनावर संयम ठेवले पाहिजे़ तरच आयुष्य सुखकर बनते़ सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने तर खूपच जपून बोलले पाहिजे़ त्यावरच त्यांची प्रतिष्ठा अवलंबून असते़
आयुष्यातील सकारात्मक बदल जीवन फुलवितो़ परंतु एखाद्याबद्दल वाईट बोलण्यासाठी कशाचीच गरज भासत नसते़ चांगले बोलण्यासाठी संस्काराची गरज असते़ तेच संस्कार भारतीय संस्कृतीत आणि जीवनपरंपरेत पाहावयास मिळतात़ केवळ ते कृतीत आणले पाहिजेत़ रागावर नियंत्रण ठेवून जीवनाची वाटचाल केल्यास समाजातील सर्वच लोक आपुलकीने वागतात. -मंगल शहा, संचालिका, पालवी प्रकल्प, पंढरपूर