पंढरपूर : ‘गोपाळकाला गोड झाला । गोपाळाने गोड केला ।।’ अशा जयघोषात विविध संतांच्या पालख्या, दिंड्या आणि हजारो वारकऱ्यांनी अवघी गोपाळपूरनगरी दुमदुमून गेली.आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळा पार पडल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे होणाºया गोपाळकाल्याचे. त्यानुसार मंगळवारी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे ५ वाजता परंपरेप्रमाणे मानाची अंमळनेरकर महाराजांची पालखी काल्याच्या उत्सवासाठी गोपाळपूर येथे दाखल झाली. त्यानंतर मंदिरामध्ये काल्याचे कीर्तन झाले.गोपाळकाला झाल्यानंतर सर्व संतांचे पालखी सोहळे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात; मात्र यंदा मंगळवारी चंद्रग्रहण असल्याने पालखी सोहळे पंढरपुरात मुक्कामी आहेत़
गोपाळकाला गोड झाला..., दिंड्या अन् वारकऱ्यांनी गोपाळपूरनगरी दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 5:41 AM