गोरडवाडीच्या सरपंच बायडाबाई गोरड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत गावात दारूबंदी करण्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेला उपसरपंच मैनाबाई गोरड, सदस्य विजय गोरड, पांडुरंग पिसे, विष्णू गोरड, मेघाराणी कर्णवर, जयश्री कोकरे, ज्योती केंगार, ताईबाई यमगर, मुगाबाई गोरड, पूनम गोरड आदी उपस्थित होते.
निर्णयाचे कुठे स्वागत कुठे निषेध
युवा पिढीच्या पुढाकाराने वर्षभरापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून नवा आदर्श घडवला. गावाच्या कोणत्याही कामातील पैसा घ्यायचा नाही असा प्रस्ताव घेऊन कामाला सुरुवात झाली. पुढे दारूबंदी ठराव झाला. त्यामुळे या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. मात्र अनेकांनी इतर अवैध व्यवसायासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.