बार्शी : मराठ्यांनी आजवर ५८ मूक मोर्चे शांततेत काढून अख्ख्या महाराष्ट्राला व सरकारला आपली ताकद दाखवली आह़े आता नोव्हेंबरमध्ये होणाºया विधिमंडळाच्या अधिवेशनाची वाट पाहत आहोत़ त्यानंतरही आरक्षण न दिल्यास निवडणुकीला सामोरे जाण्याचे धाडस कोणतेच सरकार करणार नाही, असा इशारा आ. नितेश राणे यांनी दिला.
बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात ते बोलत होते़ यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, डॉ़ प्रतापसिंह पाटील, राजेंद्र मिरगणे, रणवीर राऊत, अविनाश मांजरे ,उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, संजय पाटील- घाटणेकर आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, आज मराठा समाजाची शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती बिकट आहे. समोरच्यास जी भाषा समजते त्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे असे राणे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिले याचे दु:ख आहे. आत्महत्येपेक्षा मराठा मावळ्यांनी शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे. समोरची व्यक्ती ज्या विचाराने लढतेय, त्याच विचाराने लढले पाहिजे. आत्महत्या करू नये, आमदारांच्या राजीनाम्याचे फॅड योग्य नाही. असे ते म्हणाले. राजेंद्र राऊत म्हणाले, तालुक्यात मराठा समाज पक्षविरहीत काम करताना आरक्षण मागणीसाठी एकत्र आला आहे. तालुक्यातून मागासवर्ग आयोगाकडे फॉर्म भरण्याचे सर्वाधिक काम झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतापसिंह पाटील यांनी सरकारने तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्यावे अशी मागणी केली़ अॅड़ सिध्देश्वर नाद्रे-पाटील यांनीही पुण्यातील आरक्षण हक्क परिषदेला येण्याचे आवाहन केले़
मावळ्यांवरील केस कायम - संभाजीराजांची बदनामी करणाºयांना राज्यात फिरूच कसे देतात? वादग्रस्त वक्तव्ये करणाºया भिडेंवरील केसेस मागे घेतात, मात्र मराठा मावळ्यांवरील केसेस काढल्या जात नाहीत, असा आरोप राणे यांनी केला.