सोलापूर : राज्यात सरकार येऊनही लाेक आपल्या बाजूने नाहीत. आपल्या बाजूने जनाधार नाही, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत. हे खोके सरकार निवडणुकांना घाबरते, अशी टीका प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी केली.
काँग्रेसच्या ‘हात से हात जाेडाे’ अभियान बैठकीदरम्यान त्या बाेलत हाेत्या. शिंदे म्हणाल्या, पुण्याच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आले. प्रचंड पैसा वापरून प्रचार यंत्रणा राबविली. तरीही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात दारुण पराभव झाला.
सरकारचा नाकर्तेपणाशिंदे म्हणाल्या, उजनी ते साेलापूर पाइपलाइनमुळे साेलापूर शहराला पाणी मिळते. ही पाइपलाइन सुशीलकुमार शिंदे यांनी आणली. परंतु, भाजपच्या नाकर्तेपणामुळे आज शहराला पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळते. भाजपवाल्यांना जनतेशी काही देणे-घेणे नाही. त्यांना फक्त सत्तेशी देणे-घेणे आहे. सत्ता मिळाली की, जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःचे खिसे भरायचे व आपल्या उद्योगपती मित्रांचेही खिसे भरण्याचे काम ते करतात. पराभवाच्या भीतीमुळे सरकार महापालिका निवडणुकीला घाबरत असल्याचे त्या म्हणाल्या.