शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शासनाचे उदासीन धोरण ; बार्शी नगरपालिकेचे जवाहर हॉस्पिटल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 3:17 PM

गोरगरिबांचा दवाखाना ओळख, ब्रिटिशकालीन वास्तू

ठळक मुद्देशासनाच्या धोरणामुळे बंद ब्रिटिशकालीन हेरिटेज वास्तूच बार्शीकरांना पाहावयास मिळणारगोरगरिबांच्या आरोग्याचा आधारवड असणारा जवाहर दवाखाना क्षीण

शहाजी फुरडे-पाटीलबार्शी : एकेकाळी बार्शीकरांच्या आरोग्याची काळजी घेणारे बार्शी नगरपालिकेचे जवाहर हॉस्प् िाटल (सरकारी दवाखाना) शासनाच्या धोरणामुळे बंद झाले आहे. हा दवाखाना म्हणजे गोरगरिबांसाठी आधार होता. त्यामुळे आता ब्रिटिशकालीन हेरिटेज वास्तूच बार्शीकरांना पाहावयास मिळणार आहे़ मात्र या इमारतीची दुरवस्था होऊ नये, यासाठी पालिकेने उपाययोजना करणे गरजेचे आहे़ 

ब्रिटिश काळात म्हणजे २0 डिसेंबर १९३३ रोजी सोलापूरचे तत्कालीन कलेक्टर मि. आय. एच. टॉन्टन यांच्या हस्ते इमारतीचा कोनशिला समारंभ झाला होता. तत्कालीन बार्शी सिटी म्युनिसिपालटीचे प्रेसिडेंट गणपतराव झाडबुके, तत्कालीन चीफ आॅफिसर व्ही. आर. भिंगे यांच्या उपस्थितीत कोनशिला अनावरण समारंभ पार पडल्याची कोनशिला आजही दिमाखात इमारतीसह पाहावयास मिळते. अत्यंत वैभवशाली, गौरवशाली, भूषणावह इतिहास असलेल्या या हॉस्पिटलचे स्वातंत्र्योत्तर काळात जवाहर हॉस्पिटल असे नामकरण झाले.

बार्शी शहर तालुक्यासह परिसराच्या आरोग्याची नाडी मानल्या जाणाºया या हॉस्पिटलमध्ये डॉ. पी़ व्ही़ वखारिया, डॉ़ नयनतारा करपे, डॉ़ पाटील, डॉ़ गणपत कश्यपी, डॉ़ बी़ वाय़ यादव, डॉ़ सिध्देश्वर करजखेडे, डॉ. भरत गायकवाड आणि डॉ. विश्वनाथ थळपती या डॉक्टरांनी सेवा दिली़ या डॉक्टरांच्या जवाहर हॉस्पिटलमधील सेवेने लौकिक होता़ पी़ व्ही़ वखारियांच्या काळात तर रोज चारशे ते पाचशे पेशंटची ओपीडी असायची़ पुढे डॉ़ गायकवाड यांनीही १९८२ ते २०१३ या काळात सेवा केली़ त्यांच्या काळातही दररोज दोनशे ते अडीचशेची ओपीडी होत होती़ चिकनगुनियाच्या काळातही या हॉस्पिटलचा मोठा फायदा सर्वसामान्यांना झाला़ त्यावेळी दररोज चारशे ते पाचशे पेशंट बरे होऊन जात होते़ 

काळ बदलत गेला, शासनाची धोरणे बदलली आणि सामान्यांच्या, गोरगरिबांच्या आरोग्याचा आधारवड असणारा जवाहर दवाखाना क्षीण झाला. महाराष्ट्र सरकारने आरोग्य सेवा हा स्थानिक स्वराज्य संस्थेऐवजी राज्य शासनाचा भाग असून, आगामी काळात नगरपरिषदेचे दवाखाने बंद करण्याच्या हेतूने आकृतिबंधात नगरपरिषद दवाखान्यातील सर्व पदे अस्थायी (म्हणजे सेवानिवृत्ती नंतर पुन्हा न भरणे) केली. या राज्यस्तरीय धोरणाचा फटका बार्शीच्या या जवाहरलाल दवाखान्यालाही बसला. 

डॉ. भरत गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनंतर शहा नरसी नेणसी आयुर्वेदिक दवाखान्याचे डॉ. विश्वनाथ थळपती यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. दरम्यान, आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत जीर्ण आणि धोकादायक झाल्याने हा विभाग जवाहर हॉस्पिटलमध्ये स्थालांतरित करण्यात आला. डॉ. थळपती सेवानिवृत्त झाल्याने संपूर्ण कर्मचारी नगरपरिषद कार्यालयात वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे बार्शीचा हा सरकारी दवाखाना आता कायमचा बंद झाला आहे. 

दहा हजार कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया तर १५ हजार पोस्टमार्टेम - त्यावेळी हा पालिकेचा दवाखाना सरकारी दवाखाना होता़ कारण तेव्हा ग्रामीण रुग्णालय अथवा जगदाळे मामा हॉस्पिटलही नव्हते़ या दवाखान्यात एक्सरे, जळीत केसेस, रक्त, लघवी तपासणी या सुविधा उपलब्ध होत्या. दररोज सरासरी दोनशे ते अडीचशेची ओपीडी होत होती़ केवळ डॉ़ भरत गायकवाड यांच्या काळात १० हजार कुटुंबकल्याणच्या शस्त्रक्रिया व १५ हजार पोस्टमार्टेम या हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या आहेत़ 

रुम नंबर आठमधून चालायचे राजकारण प्रभाताई झाडबुके नगराध्यक्षा असताना व वखारिया डॉक्टर वैद्यकीय अधिकारी असताना या हॉस्पिटलमधील रुम नं ८ मधून तालुक्याचे व शहराचे राजकारण चालायचे़ 

दवाखाना बंद पडू देणार नाही, म्हणणाºया विद्यमान सत्ताधारी मंडळींच्या नगरपरिषद निवडणुकीतील वचननाम्यातील एक वचन अपूर्णच राहिले. जवाहरलाल दवाखाना बंद पडला तरी अखंडित सेवेचा वसा, वारसा असणाºया ब्रिटिशकालीन इमारतीचे जतन किंबहुना असाच लोककल्याणकारी वारसा अखंडित राहावा हिच सद्भावना.- नागेश अक्कलकोटे, विरोधी पक्षनेता,नगरपालिका, बार्शी

शासनाच्या धोरणामुळे सध्या हॉस्पिटल बंद करावे लागत आहे़ मात्र पालिकेचे हे हॉस्पिटल भविष्यात सामाजिक संस्था, संघटनेला चालविण्यास देण्यात येणार आहे़ तसा ठरावही आम्ही केला आहे़ या दवाखान्याच्या इमारतीचे भाडे निश्चित करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीकडे प्रस्ताव दिला आहे़ भाडे निश्चित झाल्यानंतर याबाबतची निविदा प्रसिध्द करुन पुढील कार्यवाही केली जाईल़ - आसिफ तांबोळी, नगराध्यक्ष, बार्शी 

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटल