पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथील दर्लिंग देवाच्या वालगाच्या प्रसादातून झालेल्या विषबाधेचे नेमके कारण अद्याप न सापडल्याने राजाराम पुजारी यांच्या मुलाकडून माहिती घेऊन प्रसाद बनविण्यासाठी खरेदी केलेल्या दुकानातील धान्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. भरकड यांनी दिली. दरम्यान, १९५ पैकी १८४ जणांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. आंबे (ता. पंढरपूर) येथे राजाराम पुजारी यांच्या घरात प्रसादाचे सेवन केलेल्या १९५ जणांना विषबाधा झाली होती. या घटनेला सात दिवस उलटून गेले. दरम्यान पोलीस, अन्न व औषध प्रशासन व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी रुग्णांना भेट दिली. आंबे गावाला भेट देऊन अधिकार्यांनी अन्नाचे नमुने तर आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनीही विषबाधित रुग्णांच्या रक्ताचे व शौचाचे नमुनेही तपासणीसाठी पुणे राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले आहेत. मात्र अद्याप विषबाधेचे कारण समजू शकले नाही. दरम्यान १८४ रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
तपासणीसाठी धान्याचे नमुने प्रयोगशाळेकडे
By admin | Published: May 13, 2014 2:00 AM