आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि १ : सापटणे (टें) येथे ग्रा.पं. पोटनिवडणुकीत झालेला पराभव सहन न झाल्याने व पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून पराभव झालेल्या गटाच्या १३ लोकांनी विजयी गटाच्या चारचाकी गाड्यांवर काठ्या, सळई, कोयते व दगडाने हल्ला केला. यामध्ये चार गाड्यांच्या काचा फुटून तिघेजण जखमी झाले आहेत. दोन्ही गट आमदार बबनराव शिंदे यांचे समर्थक आहेत.ही घटना बुधवार २८ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सापटणे-निमगाव रोडवरील विठ्ठल ढवळे यांच्या घराजवळील रोडजवळ घडली. हा प्रकार तुकाराम बाळासाहेब ढवळे व विठ्ठल माणिक ढवळे यांच्या सांगण्यावरून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत दत्तात्रय सत्यवान ढवळे यांनी सचिन विनायक ढवळे, प्रतीक विश्वास ढवळे, प्रदीप रंगनाथ कोरडे, आण्णासाहेब गोविंद ढवळे, भाऊसाहेब जगताप, गणेश भैरुनाथ ढवळे, ब्रह्मदेव नागनाथ धोत्रे, विष्णू नागनाथ धोत्रे, जगन्नाथ हरिदास आतकर, स्वप्नील जांबूवंत ढवळे, आकाश आनंद ढवळे, नाना जनार्धन ढवळे व पांडुरंग प्र. ढवळे या १३ लोकांविरुद्ध फिर्याद दिली आहे.या हल्ल्यात नानासाहेब सत्यवा ढवळे, आप्पाराव भागवत ढवळे व हनुमंत तनपुरे हे जखमी झाले आहेत. मतमोजणी बुधवारी झाली होती. यानंतर बाळासाहेब गटाचे लोक विजयी उमेदवारासह सापटणे येथून निमगाव येथे जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांना भेटण्यासाठी चार कार गाड्यात बसून निघाले होते. यावेळी दत्तात्रय ढवळे, नानासाहेब ढवळे, आप्पासाहेब ढवळे व हनुमंत तनपुरे हे चौघे एका गाडीत, दुसºया गाडीत सूरज ढवळे, बाळासाहेब ढवळे तर तिसºया गाडीत रामचंद्र ढवळे व रोहित ढवळे हे दोघे तर चौथ्या गाडीतून संतोष ढवळे व माधव ढवळे निघाले होते. या सर्व गाड्यांचा ताफा सापटणे - निमगाव रोडवरील विठ्ठल ढवळे यांच्या घराजवळून जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये कार गाड्यांच्या काचा फोडल्याने दोन लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचे सापटणे व परिसरात तीव्र पडसाद उमटल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जादा पोलीस फोर्स मागवून शांतता निर्माण करण्यात आली आहे. सध्या सापटणे गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस फोर्स तैनात करण्यात आला आहे.---------------------रोहित ढवळे विजयी- सापटणे गावात राजकीय दोन गट आहेत.एक गट बाळासाहेब ढवळे यांचा तर दुसरा एक गट तुकाराम बाळासाहेब ढवळे व विठ्ठल माणिक ढवळे यांचा आहे. २७ फेबु्रवारी रोजी येथे ग्रा.पं. निवडणुकीत एका जागेसाठी निवडणूक झाली होती. दोन्ही गटातच लढत झाली होती़ यात विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक बाळासाहेब ढवळे गटाचे रोहित जगन्नाथ ढवळे हे माजी उपसभापती तुकाराम ढवळे गटाचे तानाजी भीमराव ढवळे यांचा पराभव करून ८६ मतांनी विजयी झाले होते.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून सापटणे (टें) येथे दोन गटात हाणामारी, चार गाड्यांचे नुकसान, तिघेजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:40 PM
सापटणे (टें) येथे ग्रा.पं. पोटनिवडणुकीत झालेला पराभव सहन न झाल्याने व पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून पराभव झालेल्या गटाच्या १३ लोकांनी विजयी गटाच्या चारचाकी गाड्यांवर काठ्या, सळई, कोयते व दगडाने हल्ला केला.
ठळक मुद्दे चार गाड्यांच्या काचा फुटून तिघेजण जखमीदोन्ही गट आमदार बबनराव शिंदे यांचे समर्थक सध्या सापटणे गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस फोर्स तैनात करण्यात आला आहे