अरुण बारसकरसोलापूर: लमाण तांडे व भटक्यांच्या वस्त्यांसाठी आलेल्या निधीतून विकासकामे करण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन असल्याचे दिसून येत असून मागील वर्षी आलेल्या निधीपैकी अवघा ३७ लाख ६३ हजार रुपये खर्च झाला आहे. ४१ तांडे व भटक्यांच्या ५४ वस्त्यांसाठी निधी मंजूर झाला असला तरी अनेक ग्रामपंचायतींनी कामेच सुरू केली नसल्याचे सांगण्यात आले.
राज्य शासन लमाण समाज व भटक्यांच्या वस्त्यांच्या विकासासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून निधी दिला जातो. एकूण मिळणाºया निधीपैकी ५० टक्के निधी लमाण समाजाच्या वस्ती(तांडा)साठी व ५० टक्के निधी भटक्या समाजाच्या वस्तीसाठी दिला जावा असा नियम आहे. १७-१८ या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्याला ३ कोटी रुपये निधी आला होता. त्यापैकी दीड कोटी रुपयांची कामे ४१ लमाण तांड्यासाठी तर दीड कोटीचा निधी भटक्यांच्या ५४ वस्त्यांसाठी मंजूर केला होता. यातून सिमेंट रस्ते व गटार, पिण्याचे पाणी व अन्य कामांचा समावेश आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली कामे मंजूर झाली. या कामांची मंजूर यादी त्या-त्या तालुक्यांच्या गटविकास अािधकाºयांना देण्यात आली. मार्चमध्ये मंजूर कामांची यादी सामाजिक न्याय विभागाने पंचायत समितीला दिली असली तरी अद्याप अनेक ग्रामपंचायतींनी कामेच सुरू केली नाहीत. जूनअखेरपर्यंत ३७ लाख ६३ हजार रुपये इतका खर्च झाला असून दोन कोटी ६२ लाख रुपये अद्यापही अखर्चित आहेत.
- - जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना समितीत २४ जानेवारी २०१७ च्या शासन आदेशानुसार बदल करुन जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समितीची रचना करण्यात आली.
- - जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी, बांधकामचे कार्यकारी अभियंता, सर्व गटविकास अधिकारी व अन्य अधिकाºयांचा या समितीत समावेश करण्यात आला.
- - मागील पाच वर्षांच्या बृहत आराखड्यानुसार जिल्ह्यात १४५ लमाण तांडे व ४६१० भटक्यांच्या वस्त्या आहेत. आलेला निधी मात्र ५० टक्के लमाण तांडे व ५० टक्के भटक्यांच्या( धनगर, वडार, रामोशी व अन्य भटक्या समाजाच्या) वस्त्यांना मंजूर करण्याचा नियम आहे.
- - उत्तर तालुक्यात चार तांडे व दोन वस्त्या, बार्शी तालुक्यात दोन तांडे व ७ वस्त्या, अक्कलकोट तालुक्यात १२ तांडे व १७ वस्त्या, दक्षिण तालुक्यात १४ तांडे व ३ वस्त्या, मोहोळ तालुक्यात ५ तांडे व चार वस्त्या, मंगळवेढा तालुक्यात ४ तांडे व ७ वस्त्या, करमाळा व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी एक वस्ती, सांगोला तालुक्यात चार वस्त्या, माढा व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी तीन वस्त्या, याप्रमाणे ४१ तांडे व ५४ वस्त्यांसाठी कामे मंजूर झाली आहेत.
नवे बृहत आराखडे - सामाजिक न्याय विभागाने पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतींना नव्याने बृहत आराखडे तयार करुन सादर करण्यासाठी पत्र दिले आहे; मात्र गटविकास अधिकाºयांंकडून प्रतिसाद मिळत नसल्याने २०१८-१९ या वर्षासाठी शासनाकडून निधी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे. लवकरात लवकर नव्याने आराखडे ग्रामपंचायतींनी तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.