करमाळा : सावडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी पहिल्या सर्वसाधारण सभेपूर्वी हातात झाडू घेऊन ग्रामपंचायत परिसर स्वच्छ केला. ग्रामपंचायतीत नेतृत्व करण्यास पहिल्यांदाच संधी मिळाल्याने आनंदाच्या भरात मरगळ झटकून ही स्वच्छता केली.
सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भाऊसाहेब शेळके होते. पहिल्याच बैठकीत पाणीपुरवठ्याची कामे तसेच रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपसरपंच महेंद्र एकाड, ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब जाधव, नीलेश एकाड, सुदाम तळेकर, आबासाहेब जाधव, रामचंद्र शेलार, महादेव यदवते, दादासाहेब ठोंबरे, सागर भराठे, ग्रामसेवक तात्यासाहेब नलावडे,पाणी पुरवठा कर्मचारी ईन्नुसभाई शेख, ग्राम पंचायत शिपाई संतराम शेलार, लतीफ शेख उपस्थित होते.
सभेपूर्वी सरपंच, उपसरपंच सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचा-यांनी हातात झाडू घेऊन ग्रामपंचायत परिसर स्वच्छ केला. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला आलेली मरगळ झटकून टाकली. सावडी ग्रामपंचायतच्या इतिहासात प्रथमच असा प्रसंग असेल की, सरपंच,उपसरपंच सदस्य यांनी स्वत: हातात झाडू घेऊन साफसफाई केली. याचे ग्रामस्थांकडून कौतू
---
सरपंच कार्यालयातच भेटणार
या निवडणुकीपूर्वी सरपंचांना भेटण्यासाठी सर्वसामान्यांना त्यांचे घर गाठावे लागायचे. किंवा अन्य ठिकाणी गाठून त्यांच्याकडून कामे करुन घ्यावी लागायची. परंतु येथून पुढे सरपंच हे ग्रामपंचायत कार्यालयातच उपलब्ध असतील, ग्रामस्थांनी त्यांची कामे ही ग्रामपंचायत कार्यालयात येऊन करावीत असे अवाहन भाऊसाहेब शेळके यांनी केले.
----
फोटो : २४ सावडी
हातात झाडू घेऊन सावडी ग्रामपंचायत कार्यालय परिसर स्वच्छता करताना सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक