बार्शी : तालुक्यातील रुई ग्रामपंचायतीमधील १४ व्या वित्त आयोगामधील १४,३९,२७० रुपये रकमेच्या अपहारप्रकरणी ग्रमसेविका जयश्री दराडे यांना मंजूर केला आहे. बार्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस. सबनीस यांनी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन देण्यात आला आहे. ग्रामपंचायत रुई येथील १४ व्या वित्त आयोगाच्या खात्यातून ग्रामसेविका जयश्री दराडे यांनी त्यांच्या १ ऑगस्ट २०१८ ते १४/ जानेवारी २०२० या कालावधीत कोणतीही विकासकामे न करता, गटविकास अधिकारी यांची परवानगी न घेता रक्कम काढून स्वत:च्या इतर ग्रामपंचायत कर्मचारी व इतर खाजगी व्यक्तींच्या नावे वर्ग केली, असा आरोप ग्रामसेविका जयश्री दराडे यांच्यावर आहे. त्यावरून वैराग पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली होती.
सरकारी पक्षातर्फे कुलकर्णी यांनी काम पाहिले, तर आरोपीच्या वतीने ॲड. महेश जगताप, ॲड. किशोर करडे, ॲड. अविनाश गायकवाड यांनी काम पाहिले.
---