देशांतर्गत शेतमालाच्या वाहतुकीला गती मिळावी, यासाठी केंद्र सरकारने किसान रेल्वेचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. किसान रेल्वे सुरू झाल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांना देशाच्या बाजारपेठेत शेतीमाल पाठवणे सुलभ झाले आहे. आत्मनिर्भर अभियानातील ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, बोर, आंबा, केळी, पेरू, पपई, मोसंबी, संत्रा, डाळिंब,लिंबू, अननस, सफरचंद, फणस, बदाम, आवळा, चवळी, कारली, वांगी, काकडी, गाजर, फुलकोबी, मिरची, बटाटा, टोमॅटो, कांदा, आले, भेंडी, वाटाणे, लसूण, कांदा, बटाटा यांसह इतर शेतमाल बुकिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
कोट ::::::::::::::
सांगली, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षे कलकता, दिल्ली, मुझफ्फरपूर या बाजारपेठेत पाठवण्यासाठी तीन किसान रेल्वे सुरू आहेत. किसान रेल्वेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी, व्यापाऱ्यांनी आपला शेतीमाल पाठवावा.
- चेतनसिंह केदार-सावंत
तालुकाध्यक्ष, भाजपा