सोलापूर - संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्यावर गवत व स्टाईलस बसविण्यात येणार आहेत. शिवाय वाखरी ते पंढरपूर या हा रस्ताही मोठा करण्यात येणार असून यासाठी ७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, याच कामात रेल्वे पुलाची सुधारणारही करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
राज्यातील हे महामार्ग एकूण 223 किमीचे असून यासाठी अंदाजे रक्कम 1180 कोटी रुपये खर्च होत आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पंढरपूर ते आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पंढरपूर ते देहू संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू करण्यात आल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अन्य देशातील मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार, खासदार आदी उपस्थित होते.