शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

माढ्यात घासून.. सोलापुरात ठासून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:08 PM

राकेश कदम  सोलापूर : मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच सोलापूरचा कौल लक्षात आला. माढ्यासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत रस्सीखेच ...

ठळक मुद्देमतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच सोलापूरचा कौल लक्षात आला.माढ्यासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत रस्सीखेच सुरू होती. शिंदे आणि निंबाळकर यांच्यातील मताधिक्य कमी-जास्त होत होते

राकेश कदम 

सोलापूर : मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच सोलापूरचा कौल लक्षात आला. माढ्यासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत रस्सीखेच सुरू होती. शिंदे आणि निंबाळकर यांच्यातील मताधिक्य कमी-जास्त होत होते. दुपारनंतर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निकालाचा अंदाज येऊ लागला.  

पहिल्या फेरीनंतर...पहिल्या फेरीत भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांना २३ हजार ३९९ मते मिळाली तर सुशीलकुमार शिंदे यांना १८ हजार २४० मते मिळाली. प्रकाश आंबेडकर यांना ६ हजार ३३८ मते मिळाली. माढ्यातून संजय शिंदे यांना २० हजार ९८६ तर रणजितसिंह निंबाळकर यांना २१ हजार १६२ मते मिळाली. दोन्ही मतदारसंघाची अधिकृत आकडेवारी लवकर बाहेर आली नव्हती. संजय शिंदे यांनाच मताधिक्य मिळाल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

दुसºया फेरीनंतर...या फेरीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना २१ हजार ५४३ मते मिळाली तर डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांना १९ हजार ५७६ मते मिळाली. मात्र मागील फेरीत महाराजांना मिळालेले मताधिक्य जास्त असल्याने महाराज आघाडीवर राहिले. 

संजय शिंदे यांना २० हजार ५५३ तर निंबाळकर यांना २१ हजार ९३१ मते मिळाली. पहिल्या दोन फेरीत निंबाळकर यांनी एक हजार १४ मतांची आघाडी घेतली. आता मात्र अधिकृत आकडेवारी बाहेर येउ लागल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मतमोजणीचे अपडेट मिळत राहिले. 

पाचव्या फेरीनंतर...पाचव्या फेरीत डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांना १ लाख २४ हजार ७२ मते मिळाली होती तर सुशीलकुमार शिंदे यांना ८८ हजार ४८६ मते मिळाली होती. प्रकाश आंबेडकर यांना ३० हजार ८३३ मते मिळाली होती. यादरम्यान भाजपचे मनपातील सभागृह नेते संजय कोळी, श्रीशैल बनशेट्टी आणि इतर नगरसेवकांनी माध्यम कक्षात येउन शहरातील मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याविषयी माहिती दिली. आमचा उमेदवार किमान एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होईल, असा दावा केला. भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनीही शहर दक्षिण, अक्कलकोट या भागात झालेल्या मतदानाविषयी माहिती दिली. काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळाली. 

दहाव्या फेरीनंतर...या फेरीत डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांना दोन लाख ३८ हजार ४२२ मते मिळाली होती तर सुशीलकुमार शिंदे यांना एक लाख ६३ हजार ३०४ मते मिळाली. महाराजांना ७५ हजारहून अधिकचे मताधिक्य मिळाले होते. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांना ६५ हजार ३३३ मते मिळाली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या गोटात शांतता दिसून आली. अनेक मतमोजणी केंद्रावरील कार्यकर्ते हळूहळू काढता पाय घेत होते. एव्हाना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही निकाल लक्षात आला होता. त्यामुळे त्यांचेही बरेच कार्यकर्ते बाहेर जात असल्याचे पाहायला मिळाले. 

माढ्यातून रणजितसिंह निंंबाळकर यांना दोन लाख ३१ हजार तर संजय शिंदे यांना दोन लाख १३ हजार ८३८ मते मिळाली. दोघांमधील मताचे अंतर १७ हजार होते. माळशिरस, माण, फलटण तालुक्यातून निंबाळकर यांना मिळणारे मताधिक्य वाढत होते. दुसरीकडे  करमाळा, माढा आणि सांगोला तालुक्यातून संजय शिंदे यांना मिळणारे मताधिक्य माळशिरस आणि माणच्या तुलनेत कमी असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांच्यास कार्यकर्त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातारण दिसू लागले होते. दुसरीकडे भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत चालला होता.  

अन् जल्लोष सुरूपंधराव्या फेरीनंतर डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांचे मताधिक्य एक लाखाहून अधिक झाले होते तर रणजितसिंह निंबाळकर यांचे मताधिक्य ४० हजारापेक्षा जास्त झाले होते. त्यामुळे सोलापुरातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते रामवाडी गोदामातून बाहेर पडून शहरात जल्लोष करण्यासाठी निघाले. काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज होउ निघून गेले. 

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल