पंढरपूर : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती समाजातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची वाढ व्हावी तसेच चालना मिळावी या हेतूने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी पार पडलेल्या बुद्धिबळ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. सहभागी पैकी २३ खेळाडूंना रोख रक्कम, सन्मानचिन्ह तसेच पदक देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर देवकते, शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्ष विजय डुबल व उपाध्यक्ष चरण गायकवाड, डॉक्टर दीक्षित, डॉक्टर मंदार सोनवणे, तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, पोलीस निरीक्षक अरुण पवार, आढीवचे सरपंच मेजर चव्हाण, धनंजय कोताळकर, रमाकांत पाटील, निशिगंधा बँकेचे मॅनेजर कैलास शिर्के, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, प्राध्यापक रजनी जाधव, राधिका चव्हाण, प्रा. प्रभावती गायकवाड, ॲड. प्राजक्ता शिंदे, रतन थोरवत, उपस्थित होते.
कोरोना काळात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर पंकज गायकवाड, डॉक्टर प्रताप घाडगे, डॉक्टर संगीता पाटील या डॉक्टरांना मराठा महासंघाच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी नैसर्गिक शेती करणारे शेतकरी वासुदेव गायकवाड, अमर ढोणे, प्रसाद पाटील, विकास दुबल यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पंढरपूर ते पश्चिम बंगाल हे २२०० किलोमीटरचे अंतर सायकलवर पूर्ण केल्याने शिक्षक दिगंबर भोसले आणि विद्यार्थी सचिन राऊत यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी राजश्रीताई लोळगे, वनिता बनसोडे, अमृता शेळके, साधना राऊत, सचिन गंगथडे, गुरुदास गुटाळ, संतोष जाधव, शिवाजी मोरे, सुनील झिरपे, अमोल पवार, नागेश गायकवाड, पांडुरंग शिंदे, अतुल सावंत, सतीश धनवे, प्रणव गायकवाड, संतोष चव्हाण, काका यादव, शामराव साळुंखे, श्रीनाथ माने, सोमनाथ पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन थिटे, दिगंबर जाधव, महेश माने, प्रशांत जाधव, नितीन जगदाळे, संतोष घाडगे, महेश उंबरकर, नवनाथ आरे, रोहित राजे चव्हाण, वैभव राजे चव्हाण, भास्कर घायाळ, सागर माने, गणेश माने यांनी परिश्रम घेतले.
---
२५ करकंब
पंढरीत मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना
डॉक्टर देवकते, विजय डुबल, चरण गायकवाड, डॉक्टर दीक्षित, डॉक्टर मंदार सोनवणे, पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस निरीक्षक अरुण पवार