अनगर : येथील स्व. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याच वेळी जगन्नाथ शिंदे, मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, किसान सारडा या चार हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)साठी निवड झालेल्या स्वप्निल कृपाळचा प्राचार्य चंद्रकांत ढोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व चार हुतात्मा यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य चंद्रकांत ढोले, उपप्राचार्य सीताराम बोराडे, पर्यवेक्षक शिवाजी मोटे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय डोंगरे, मल्लिकार्जुन कृपाळ, सोमनाथ ढोले, महादेव बारबोले उपस्थित होते.
---
फोटो : १२ अनगर
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन करताना प्राचार्य चंद्रकांत ढोले, सीताराम बोराडे, शिवाजी मोटे, स्वप्निल कृपा.