शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

सोलापूरच्या कृषी महोत्सवात शेतकºयांची वाढती गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:37 AM

कृषी महोत्सवातून फडणवीस सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांचा जागरही या माध्यमातून सुुरू आहे. 

ठळक मुद्देहोम मैदानावर रविवारपासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेमहोत्सवात जिल्ह्यातील तरुण उद्योजकांची व्यवसायोपयोगी साधनेही भरपूर

सोलापूर : ज्वारीपासून बनविलेला केक, गूळ शर्करा, डाळिंबाचे कुकीज, तंत्रज्ञांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेली शेतीउपयोगी उपकरणे, कडकनाथची अंडी आणि गटशेती करणाºया शेतकºयांनी पिकविलेली अन्नधान्ये अशा एक नव्हे अनेक गोष्टी होम मैदानावरील जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे फडणवीस सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांचा जागरही या माध्यमातून सुुरू आहे. 

होम मैदानावर रविवारपासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसºया दिवशी सोमवारी प्रदर्शन पाहण्यासाठी लोक आले होते. पहिला स्टॉल कृषी विभागाचा आहे. यात जिल्ह्यातील काही शेतकºयांनी केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची छायाचित्रांसह माहिती देण्यात आली आहे. जलयुक्त शिवारचे जिल्हा समन्वयक रवींद्र माने आणि सहकाºयांनी बनविलेल्या मळेगाव येथील पाणलोट क्षेत्राचे मॉडेल दुसºया स्टॉलमध्ये आहे.

पाणलोटाअभावी अविकसित गाव आणि पाणलोटाची कामे झाल्यानंतर विकसित झालेल्या गावातील भौगोलिक परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे मांडण्यात आली आहे. कृषी विज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर बाजार समिती, भीमा कालवा मंडळ, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांनीही स्टॉल लावले आहेत. या शासकीय स्टॉलमधून योजनांची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महोत्सवात जिल्ह्यातील तरुण उद्योजकांची व्यवसायोपयोगी साधनेही भरपूर आहेत. 

ज्वारीच्या केकला अनेक फ्लेवर- ज्वारीपासून भाकरी आणि फारतर हुरडा मिळतो. मात्र कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन करून ज्वारीचा केक बनविला आहे. केकबरोबरच इतर प्रकारची उत्पादने तयार करण्यात आली आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ अनिता शेळके म्हणाल्या, ज्वारीचा वापर करून रवा, इडली, लाडू, चकली व केक यांसारखी अनेक उत्पादने तयार करता येऊ शकतात. ज्वारीपासून केक बनवण्याचे संशोधन एक महत्त्वाचे संशोधन म्हणून ओळखले जाईल.

केक बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ व बेकिंग पावडर चाळून मिक्सरमध्ये टाकली जाते. त्यात दूध, तूप व साखर टाकून त्याचे मिश्रण केले जाते. हे मिश्रण ओव्हनमध्ये २०० डिग्री तापमानाला १५ ते २० मिनिटे बेक केल्यास केक तयार होतो. त्यावर आवश्यकतेप्रमाणे क्रीम लावू शकतो अथवा क्रीमशिवाय कप केक म्हणूनही याचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये मँगो, पायनापल किंवा चॉकलेट फ्लेवर बनवता येऊ शकतात. जलकमल उद्योग समूहाच्या गूळ शर्कराचेही शेतकºयांना आकर्षण आहे. 

शालेय विद्यार्थ्यांचा प्रयत्न- जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर कुर्डूवाडी येथील विद्यार्थ्यांनी शेती उपकरणे , दिगंबर जैन गुरूकुल, सिद्धेश्वर इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही असेच उपकरणे , तळेहिप्परगे येथील हर्षवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाणी व आपत्ती व्यवस्थापन विषयावर उपकरण सादर केले आहे. विशेष शिक्षक व्ही. ए. येडके आणि एस. एस. शेख यांनी दिव्यांगांसाठीच्या योजनाही सादर केल्या आहेत. याकामी उत्तर सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे आणि दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदagricultureशेतीFarmerशेतकरी