रुपेश हेळवे, सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील हे रे नगरची पहाणी करणार आहेत. त्यानंतर आता थोड्याच वेळेत श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.
शनिवारी रात्री ११ वाजता सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी असणार आहेत. तेथून शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून वाहनाने कुंभारी, ता. दक्षिण सोलापूरकडे जाऊन तेथे रे नगर गृहनिर्माण प्रकल्प, कुंभारी येथे भेट घेऊन तेथील आढावा घेतील. दुपारी १२.३० वाजता सिद्धेश्वर मंदिर येथील नंदीध्वज अक्षता सोहळ्याला ते उपस्थित असणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता जुने एम्प्लॉयमेंट चौकातील शांतिसागर मंगल कार्यालय आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून आयोजित स्नेहभोजनास जाणार आहेत. दुपारी ४ वाजता हुतात्मा चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व चार हुतात्मा चौक येथील कामाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती असणार आहे. त्यानंतर सोलापूर महानगरपालिका येथील इंद्रभवन इमारतीच्या नूतनीकरण कामास भेट देणार आहेत.