सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार, ६ जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी पावणेसात वाजता सिद्धेश्वर एक्स्प्रेसने सोलापूर रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होणार आहे. दुपारपर्यंत शासकीय बैठका घेऊन पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. पंढरपुरात आषाढी एकादशी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेणार आहेत.
शनिवारी सकाळी ९ वाजता रामचंद्र बुर्ला महाविद्यालयात आयोजित विद्यार्थिनींच्या कृतज्ञता मेळाव्यास पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर साडेदहा वाजता नियोजन भवनात जिल्हा नियोजन आराखडा बाबत विभागप्रमुखांची बैठक घेणार आहेत. दुपारी पावणे एक वाजता सेटलमेंट ग्राउंडवर आयोजित महिलांच्या कृतज्ञता मेळाव्यास पालकमंत्री पाटील हे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पंढरपूर आषाढी यात्रेच्या नियोजनाची आढावा बैठक घेणार आहेत. दर्शनरांगेतील पत्रा शेडची देखील पाहणी करणार आहेत. त्यानंतर पावणेसात वाजता पालकमंत्री पाटील हे पंढरपूर येथून पुण्याकडे रवाना होणार आहेत.