पालकमंत्र्यांच्या हेतूमुळे सोलापूर जिल्ह्यावर मोठा आघात ठरणारा हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी या बैठकीत सर्व पदाधिकऱ्यांनी यावेळी केली आहे.
मंगळवारी दुपारी १ वाजता कुर्डू येथील गाडेवस्तीवर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी एकत्र जमले. जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, शेतकरी नेते अतुल खूपसे-पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळवणकर, प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हाप्रमुख दत्ता व्यवहारे, रयत शेतकरी संघटनेचे नेते दिगंबर गायकवाड, स्वाभिमानी संघटनेचे नेते अजित बोरकर, धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र वाघमारे, कोळी महासंघ शेतकरी संघटनेचे पप्पू कोळी व किसान मोर्चाचे पदाधिकारी आदी वर्गांची एकत्रित बैठक झाली.
यावेळी उजनी पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.
या बैठकीत प्रत्येकाने उजनी धरणासंबंधी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना जनहितचे प्रभाकर देशमुख म्हणाले की, पालकमंत्र्यांनी पळविलेले पाणी हे जिल्ह्याच्या हक्काचे आहे. त्यांनी येथील सर्वांची दिशाभूल करीत इंदापूरच्या फायद्यासाठी पाणी इंदापूरला नेण्याचा निर्णय मंजूर करून घेतला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही हात असल्याने त्यांच्या पक्षाचे नेते याविरुद्ध काही करू शकणार नाहीत, म्हणून आम्ही सर्व जण एकत्र येत उजनी धरणाबाबत लढा उभा करीत असल्याचे स्पष्ट केले.
धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी याबाबत लवकरच जनहित याचिका दाखल करत असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
-----
महाराष्ट्रदिनी लढा उभारणार
शेतकरी नेते अतुल खुपसे पाटील बोलताना म्हणाले की, उजनी धरण म्हणजे सर्वांच्या आत्मीयतेचा विषय आहे. त्यात या निर्णयाच्या मागे स्वतः अजित पवार हे अग्रस्थानी असल्याने करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी याबाबत जी भूमिका घेतली आहे, ती चुकीची आहे. ते म्हणतात की, मी पवार साहेबांच्या मर्जीतला असून, त्यांचा कोणताही शब्द मोडत नाही. यावरून त्यांनी जर यावर त्यांना गप बसण्याचे आदेश दिले, तर ते काहीही करू शकणार नाहीत. म्हणून सर्वसामान्य नागरिकांनाच या लढ्यात उतरावे लागणार आहे. म्हणून १ मे या महाराष्ट्रदिनी आम्ही उजनीसंबंधी मोठा लढा उभा करत आहोत. त्यास सर्वांनी सहकार्य करावे.
----
२७ कुर्डूवाडी-उजनी बैठक १,२,३
पालकमंत्र्यांनी उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला घेतल्याच्या निषेधार्थ कुर्डू येथे आयोजित बैठकीला उपस्थित शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी.