कृषी विभागामार्फत भोसे (ता. पंढरपूर) येथे ‘कृषी संजीवनी’ सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच गणेश पाटील, उपसरपंच भारत जमदाडे उपस्थित होते. यावेळी कृषी सहायक डी. जी. खोत यांनी कृषी संजीवनी सप्ताह बाबत माहिती दिली. कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने कृषी संजीवनी सप्ताह सुरू केल्याबद्दल सरपंच गणेश पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी नामदेव कोरके, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक धैर्यशील पाटील, नारायण कोरके, उमेश श्रीखंडे, धनाजी तळेकर, समाधान खुपसे, कोंडीबा कोरके, सुरेश कोरके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना फळबाग लागवड, फळ पीक विमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना, नवीन लागवड तंत्रज्ञान, महाडीबीटी पोर्टलवरील विविध योजना याबाबत मंडल कृषी अधिकारी महेश देवकते यांनी माहिती दिली. द्राक्ष पीक लागवडीमध्ये उत्पादन वाढ व धोके याबाबत कृषी सहायक डी. डी. वसेकर यांनी माहिती सांगितली.