मंगळवेढा : भैरवनाथ शुगर वर्क्स (लवंगी) येथे सोलापूर ग्रामीण जिल्हा वाहतूक शाखेमार्फत रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत ऊस वाहतूक करणा-या वाहनांना रिफलेक्टर लावण्यात आले. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक सपंगे यांनी ऊस वाहतूक चालकांना मार्गदर्शन केले. वाहनांना रिप्लेक्टर व बॅनर लावण्यात यावेत, टेप रेकोर्डेड बंद करणे, नादुरुस्त वाहनाच्या दुरुस्तीकरिता वाहन रस्त्यावर उभे करण्यात येऊ नये, वाहन चालवितांना मोबाइलचा वापर व मद्यप्राशन करू नये अशा सूचना केल्या. यावेळी सहायक फौजदार कोरेशेट्टी, पोलीस नाईक मुदगुल, पोलीस शिपाई पवार, कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत, जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी कृष्णदेव लोंढे, एच.आर. मॅनेजर संजय राठोड, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, कार्यालय अधीक्षक अभिजित पवार उपस्थित होते.
---
फोटो : २२ भैरवनाथ
भैरवनाथ साखर कारखाना येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफलेक्टर लावताना सहायक पोलीस निरीक्षक सपंगे.