‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यातील मलिकपेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत इयत्ता पहिलीच्या मुलांची शंभर टक्के पटनोंदणी करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक किशोर तोडकर यांनी दिली. विद्यार्थ्यांना दीक्षा ॲप, स्टडी वेल तसेच स्वाध्याय उपक्रमांतर्गत ऑनलाइन सहभाग वाढवण्यासाठी पालकांशी संवाद साधला.
मोहोळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी, शिरापूर बीटचे विस्ताराधिकारी मल्लिनाथ स्वामी, केंद्रप्रमुख आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड नियमांचे पालन करत शाळा-प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक किशोर तोडकर, शरयू थोरात, संगीता कावरे, वैशाली सुतार यांनी गृहभेटीद्वारे पालकांशी संवाद साधला.
.----फोटो १९ मोहोळ-एज्युकेशन