आॅनलाइन लोकमत सोलापूरमंगळवेढा दि १ : संताची नगरी मानली जाणा-या मंगळवेढा तालुक्यात वाळू माफियांच्या घुसखोरीमुळे दहशत वाढत आहे. त्यामुळे जनतेला जीव मारण्याचा धमक्या येत आहेत. अनेकांना मारहान होत आहे. याला पुर्णता मंगळवेढा येथील कार्यरत असलेले तहसिलदार प्रदीप शेलार जबाबदार असून तहसिलदार यांच्या मानहानी व दहशतवादी कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान धोक्यात येत असल्यामुळे आज शनिवार दि.१ जुलै रोजी दामाजी चौकामधून हालगी मोचार्ने सुरवात करून प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.गेल्या १७ महिन्यापासून मंगळवेढा येथील कार्यभार सांभाळणारे तहसिलदार प्रदीप शेलार अधिकाराचा दूरूपयोग करून कर्तव्यात कसूर करीत आहेत. जाणीवपुर्वक चोरटया वाळूला पाठीशी घालत आहेत. त्यामुळे तालुक्यात व नदीकाठच्या भागात २०० हून अधिक ट्रॅक्टर जीसीबी ट्रकच्या सहायाने चोरटया मागार्ने अवैद्य वाळू उपसा व वाहतूक करीत आहेत. यावर कारवाई करण्याऐवजी तहसिलदार स्वहित साधण्यासाठी अर्थमैत्री ठेवून एकप्रकारे वाळू माफियांना पाठीशी घालत आहेत. चोरटया वाळूसाठी बोकाळलेली वाळू चोर गुंडगिरी प्रवृत्तीने दिवसरात्र दहशत ठेवून वाळू उपसा करीत आहेत. अनेकांना त्यांनी मारहाण केली जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, तक्रारदारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करून तहसिलदारांचया आशिवार्दाने लखपतीहोत आहेत. चोरटया वाळूमुळे प्रवाशी वाहतुकीला अडथळा होत असल्याने अपघात वाढत आहेत. रस्ते खराब झाल्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय, शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान, वाहनामुळे नोकरदार, व्यापारी, शेतक-यांची कामे खोळांबली, यासह अनेक समस्या दिवसेंदिवस वाढल्यामुळे तहसिलदारांकडून थेट जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार घडत आहे.गैरप्रकारच्या कामात रस ठेवून अर्थमैत्रीतून कारभार करणारे तहसिलदार मंगळवेढा लुटण्यास अभय देत आहेत. पुनर्वसन जमिन, उजनी प्लाट खरेदी विक्रीत हितसंबंध ठेवून कारभार करतात. कोटयावधीच्या बुडणा-या महसुलकडे कानाडोळा करणा-या व कर्तव्याचे भान विसरलेले तहसिलदार मंगळवेढयासह प्रशासनाला भारी पडत आहेत अशा तहसिलदारांचा कारभार मंगळवेढेकरांना पहिल्यांदाच अनुभव पहावयास मिळत असल्याने सर्व भागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी त्यांच्या विरोधात महसूलमंत्री, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी, उपोषण करून तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींना केराची टोपली दाखवून मुजोरपणे तालुक्यात अवैद्य मागार्ला खो घालणारे तहसिलदार प्रदीप शेलार हटाव चीमागण्यासाठी हे उपोषण सुरू केले आहे़यावेळी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पंचायत समिती सदस्य रमेश भांजे,सरपंच रामचंद्र मळगे, विलास व्हनुटगी,विनोद पाटील,संतोष सोनगे,दयानंद सोनगे,भाजपचे गौरीशंकर बुरकुल ,शशिकांत चव्हाण,बळीराजा संघटनेचे संतोष पवार,काँग्रेसचे मारुती वाकडे,होलार समाज अध्यक्ष हैदर केंगार, नाथा ऐवळे यांच्यासह ७०० ग्रामस्थ उपस्थित होते.
मंगळवेढ्याचे तहसिलदार प्रदीप शेलार यांच्या विरोधात हलगी मोर्चा
By admin | Published: July 01, 2017 7:55 PM