हलदहिवडी येथील विष्णू प्रभाकर गायकवाड हे ९ जून रोजी रात्री त्यांचे पृथ्वीराज किराणा दुकान बंद करून घरात गेले. दरम्यान, पहाटे त्यांच्या दुकानात कशाचा तरी आवाज येऊ लागल्याने सर्वजण झोपेतून उठले. त्यावेळी दुकानामध्ये अंदाजे २१ ते २५ वयोगटातील तोंडाला रुमाल बांधलेले तीन इसम त्यांना दिसून आले. त्यांनी तुम्ही कोण आहात, अशी विचारणा केली असता चोरट्यांनी काहीही न बोलता दुकानातून धूम ठोकली. चोरट्यांनी दुकानातून रोख ३५ हजार रुपये चोरून नेले. तसेच डॉ. दास यांच्या शिवकृपा दवाखान्यातून रोख २० ते २१ हजार रुपये, तर उमेश पाटील यांच्या ज्योतिर्लिंग किराणा स्टोअर्सचे शटर उचकटून ड्राव्हरमधून रोख १५ ते १७ हजार रुपयांसह खोबरे व संतूर साबण अशा जीवनावश्यक वस्तू चोरून नेल्या.
यानंतर चोरट्यांनी रामलिंग पवार यांच्या अजित किराणा स्टोअर्ससमोरील शेडमधील बल्ब चोरले. तसेच वसंत खजिने यांच्या सचिन किराणा स्टोअर्सचे शटर उचकटून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब झोळ यांनी चोरी झालेल्या ठिकाणास भेटी देऊन पंचनामा केला. याबाबत विष्णू प्रभाकर गायकवाड यांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फोटो ओळ :::::::::::::::::::::::
चोरट्यांनी हलदहिवडी येथे मुख्य चौकात सचिन किराणा स्टोअर्सचे शटर उचकटून चोरी केल्याचे छायाचित्र.