तलाठी हा महसूल व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. गेल्या वर्षभरापासून हंजगी गावाला तलाठीच येत नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली असता तात्पुरता चार्ज अन्य तलाठ्याकडे देण्यात आल्याचे सांगण्यात येते. परंतु अतिरिक्त चार्ज घेतलेले तलाठीही गावाकडे कधीच फिरकत नाहीत. यामुळे ग्रामस्थांना तलाठ्यांच्या भेटीसाठी हंजगी येथून १२ किलोमीटर अंतरावरून अक्कलकोटला जावे लागते. येथेही त्यांची भेट होईलच याची शाश्वती नसते. आठवडाभरात प्रशासनाने हंजगी गावाला कायमस्वरूपी तलाठी न दिल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा तंटामुक्त अध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
----
हंजगी तलाठी सेवानिवृत्त झाले आहेत. दुसऱ्या गावच्या तलाठ्यांना प्रभारी चार्ज दिला आहे. ग्रामस्थांनी नवीन तलाठी येईपर्यंत सांभाळून घ्यावे. तसेच बसण्यासाठी ऑफिस नाही, तात्पुरती सोय करून दिल्यास सोयीचे होईल.
- सिद्धाराम जमादा, मंडल अधिकारी, जेऊर
--