बार्शी : शाळा फाऊंडेशनच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा शिववक्ता’ या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत जळगावची हंसिका नरेंद्र महाले तर पाचवी ते आठवी गटात रायगडची श्रावणी सुनील सोरेगावकर या दोघांनी प्रथम क्रमांक पटकावला. शाळा फाऊंडेशनचे संयोजक प्रतापसिंह मोहिते यांनी या स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
पहिली ते चौथीच्या गटात द्वितीय क्रमांक श्रद्धा सचिन खोत (कोल्हापूर), तृतीय क्रमांक समृद्धी संदीप कारखेले (रायगड) तर पाचवी ते आठवीच्या गटात उत्तेजनार्थ मफिरा अमीर मुलाणी (सोलापूर) व प्रियदर्शिनी दिलीप हाके (सांगली) हे विजेते ठरले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या गटात द्वितीय क्रमांक वैष्णवी वसंत कंक (पुणे), तृतीय क्रमांक समृद्धी संजय भोसले (सोलापूर), उत्तेजनार्थ शरयुक्ता शरद येडके (सोलापूर) व वेदांत रमेश ठाणगे (अहमदनगर) हे स्पर्धेत विजेते ठरले.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून ७४२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धकांची भाषणे राज्यभरातून व देशभरातून दीड लाख लोकांनी शाळा फाऊंडेशन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहिली आहेत.
-----
फोटो : १५ हंसिका महाले, १५ प्रतापसिंह मोहिते, १५ श्रावणी गोरे