जाणीव फाउंडेशन वृक्षसंवर्धन समितीच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.
नगरपालिकेचे प्रमुख गटनेते विजयनाना राऊत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. बाजार समिती व्यापारी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष बाबासाहेब कथले, पीएसआय श्यामराव गव्हाणे, आदर्श उद्योग समूहाचे रवी अण्णा राऊत, आरोग्य सभापती पिनू काकडे, दीपक काकडे, मैनोद्दीन तांबोळी, मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप गांधी, विजूमामा लोमटे, नगरसेवक विलास रेणके, बगले दादा व मर्चंट असोचे सदस्य दीपकनाना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जाणीव फाउंडेशन व वृक्षसंवर्धन समितीच्या वतीने वैकुंठधाम येथे बाजार समितीचे व्यापारी असोचे नूतन अध्यक्ष बाबासाहेब कथले व त्यांच्या सर्व टीमचे व इतर मान्यवरांचा फेटा, पुष्पगुच्छ, श्री भगवंताची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाणीव फाउंडेशन वृक्षसंवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
नवीन वैकुंठधामचे सुशोभीकरण कार्य गेल्या वर्षी लोकसहभागातून व लोकवर्गणीतून करून ७० टक्के काम पूर्ण झाले असून, लॉकडाऊनमुळे निधीअभावी बंद होते. दानशूरांनी रोख देणगी दिल्याबद्दल फाउंडेशन व वृक्षसंवर्धन समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
२१ बार्शी-वृक्षारोपण