वयाच्या ५८ व्या वर्षीही दैनंदिन व्यायामाचे प्रेम जोपासणारे डॉ. खुणे हे गेले तीन वर्षे दररोज आहार-विहार, आचार -विचार, जीवनविषयक दृष्टिकोन, व्यसनमुक्तता याबाबतीत अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये चारोळी सांगण्याचा परिपाठ त्यांनी सुरू केला आहे. त्यांच्या पत्नी वैशाली खुणे यांनी नित्यनेमाने सर्वांना आनंदी राहा असे म्हणण्याचा सल्ला देतात.
हेच संदेश ठरतात आनंददायी
प्रत्येकाने निरोगी, निकोप आयुष्य जगले पाहिजे. दिवसातला किमान एक तास तरी स्वतःसाठी राखून ठेवला पाहिजे. विनाखंड व्यायाम केलाच पाहिजे. आयुष्याला हसतमुखाने सामोरे गेले पाहिजे. तुमचा जीवनाकडे पाहण्याचा खिलाडू, आनंदी व सकारात्मक दृष्टिकोन तुमचे जीवन बदलू शकतो, असे विविध संदेश डॉ. खुणे देतात. त्यांचे शब्द साधे आणि बोलीभाषेमध्ये संदेश असल्याने ते भावतात. बालगोपाळांनीही स्वागत केले आहे.