काशिनाथ वाघमारे, साेलापूर : नेहमीप्रमाणे उन्हाळ्यात स्थानिक फळांचं प्रमाण घटलं असून परप्रांतातल्या फळांची आयात वाढली आहे. तसेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आंबासोलापूरच्या फळ बाजारात दाखल झाला आहे. तसेच हैदराबादचा बदाम आंबाही दाखल झाला असून सर्वसामान्य त्याची खरेदी करताहेत.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पाणीदार फळांना मागणी आहे. कडक उन्हात शरिरातील पाणी कमी होते. अशावेळी लिंबू शरबत अन ताकासह पाणीदार फळांकडे सर्वसामान्यांचा कल असतो. मात्र यंदा स्थानिक पातळीवरची फळं बाजार पेठेत कमी झाली असून परराज्यातून आयात होत आहेत. याशिवाय रत्नागिरी आणि देवगड येथून हापूस तर हैदराबादहून बदाम आंबा दाखल झाला आहे.
ढेरी कमी करणारी 'वॉटर अॅपल'..
यंदा सोलापुरात प्रथमच 'वॉटर अॅपल' हे नवीन फळप्रकार लक्ष्मी मार्केटमध्ये सोलापूरकरांना पाहायला मिळत आहे. बोराच्या चवीप्रमाणे असणारे हे फळ २४० रुपये दराने विकले जात आहे. शरीरात पाण्याचं प्रमाण वाढवतं अन टिकवते. मागील आठ दिवसापूर्वी काश्मीरमधून हे फळ दाखल झालं असून ते मिठासोबतही खातात. या फळातील गुणधर्मामुळे वाढलेली ढेरी कमी होऊ शकत असल्याचे वैशिष्ट्य फळ विक्रेत्यांनी सांगितले.यंदा नागपूसह ऑस्ट्रेलियनमधून संत्रा विक्रीला आला आहे. स्थानिक फळांचं प्रमाण कमी झालं आहे. आफ्रीकेतून पेर विक्रीला आला आहे. - शोएब बागवान, फळ विक्रेते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"