शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बनावट हाॅल तिकीटद्वारे दहावीची परीक्षा देणाऱ्या डमी स्टुडंटला तीन वर्षे सक्तमजुरी

By विलास जळकोटकर | Published: January 06, 2024 6:12 PM

सोलापूर : दहावीच्या बोर्ड परीक्षेला मुळ विद्यार्थ्याऐवजी त्रयस्ताला बनावट हॉलतिकिट बनवून परीक्षा दिल्याप्रकरणी तोतया विद्यार्थ्याला मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी ...

सोलापूर : दहावीच्या बोर्ड परीक्षेला मुळ विद्यार्थ्याऐवजी त्रयस्ताला बनावट हॉलतिकिट बनवून परीक्षा दिल्याप्रकरणी तोतया विद्यार्थ्याला मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. मल्लिनाथ शिवानंद वाले (रा. कमलानगर, विजापूर रोड, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. या खटल्यातील अन्य एक आरोपी नितीन नारायणसिंग हा खटल्यादरम्यान मयत झालेला असल्याने त्याचा खटला बंद करण्यात आला. घटनेनंतर तब्बल २५ वर्षानंतर या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील आरोपी नितीन नारायणसिंग हजारे व मल्लिनाथ शिवानंद वाले (रा. कलानगर, विजापूर रोड, सोलापर) यांच्या विरोधात सिद्धेश्वर कन्या प्रशालेत १९९९ साली कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुख शैलजा रणभारे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्ळात फिर्याद दाखल केली होती.

सदर घटनेमध्ये १७ मार्च १९९९ रोजी नितीन हजारे व मल्लिनाथ वाले यांनी चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेचा बनावट शिक्का व ओळखपत्र तयार करुन दहावीच्या परीक्षेसाठी हालतिकिट तयार केले. त्यावर तत्कालिन मुख्याध्यापिका अनुगीता पवार यांची बनावट सही केली. आरोपी क्रमांक १ नितीन याचा फोटो काढून त्या ठिकाणी मल्लिनाथ याचा चिटकवला. त्यानंतर आरोपी २ मल्लिनाथ वाले हा इतिहास -भूगोल विषयाचा पेपर देताना १७ मार्च १९९९ रोजी फिर्यादी केंद्रप्रमुख शैलजा रणभारे यांच्या निदर्शनास आला. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका पवार, ब्लॉक सुपरवायझर एम. बी. मनोरे यांच्याकडे चौकशी करुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली होती.

तपास अधिकारी गजानन शिंदे यांनी आरोपीकडून शाळेचे बनावट शिक्के, सह्यांचे नमुने घेऊन हस्ताक्षर तज्ञाकडे पाठवले. त्यात आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होताच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून ॲड. अमर डोके यांनी तर आरोपीकडून ॲड. गडदे व कांबळे यांनी काम पाहिले.पाच जणांच्या नोंदवल्या साक्षी

या खटल्याच्या सुनावणीत कोर्टाने पाच जणांच्या साक्षी नोंदवल्या. त्यात दोन्ही आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या द्वारे गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सरकार पक्ष व आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मल्लिनाथ वाले यास तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावली. यातील अन्य आरोपी नितीन हजारे हा खटल्यादरम्यान मयत झाल्यामुळे त्याचा खटला बंद करण्यात आला.२५ वर्षे कालावधी

हा गुन्हा १७ मार्च १९९९ रोजी घडला होता. पोलिसांच्या तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. त्यानंतर अनेक कायदेशीर बाबींच्या सोपस्कारानंतर निकाल लागण्यास २०२४ साल उजाडले.

टॅग्स :Solapurसोलापूर