पंढरपूर : खासगी हॉस्पिटलमधील अस्वच्छता व शौचालय अस्वच्छ असल्या कारणाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने हॉस्पिटलमधून सकाळी सात वाजता चड्डी व टॉवेलसह पलायन केले. हा प्रकार बुधवारी पंढरपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये घडला.
भाळवणी येथील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एका खासगी हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपासून उपचार घेत होता. बुधवारी त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने हॉस्पिटलमधून पलायन केले. यानंतर हॉस्पिटलच्या प्रशासनाने शोधाशोध केली. परंतु त्यांना रुग्ण सापडला नाही. रेल्वे स्टेशन प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ तो रुग्ण जाऊन बसला होता. तीन तास एकाच ठिकाणी तो रुग्ण बसला. त्याचबरोबर त्याच्या दोन्ही हातामध्ये सलाईनसाठी लावलेली सुई तशीच होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याला विचारले तर त्याने सांगितले की, मी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे, परंतु हॉस्पिटलमध्ये अस्वच्छता असल्याकारणाने पळून आलो आहे. मी शौचास जाऊन आलो आहे. मला निवांत बसू द्या, अशी विनंती करु लागला. त्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती.
त्या रुग्णाने रेल्वे पुलाजवळील हॉस्पिटलमधून पळून आल्याचे हात करुन सांगितले. यामुळे त्याठिकाणच्या समाजसेवकांनी गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. त्यावेळी तेथून एक रुग्ण पळून गेला आहे. हॉस्पिटलमधील कर्मचारी त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हॉस्पिटलच्या कर्मचाºयांनी त्याला रुग्णवाहिकेमधून परत रूग्णालयात आणले.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेला आहे. त्याला शोधण्याचे काम सुरु होते. परंतु त्याने अस्वच्छतेचे कारण सांगितले आहे. त्याला आमच्या हॉस्पिटलमध्ये अस्वच्छता वाटत असेल तर त्यांनी स्वच्छ वाटणाºया दुसºया हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा. हॉस्पिटलचे बिल मागितले तर अशी कारणे सांगतात.- डॉ. पारस राकाखासगी हॉस्पिटल
इतर लोकांचा जीव धोक्यातकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमधून पळून येऊन रेल्वे स्टेशनजवळ बसला होता. यामुळे त्याच्याजवळून जाणाºया लोकांना कोरोना होण्याची शक्यता होती. काही नागरिकांनी त्याला पाहिल्यानंतर तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये जात नाही. तोपर्यंत ते नागरिक त्याठिकाणीच थांबून होते व येणाºया-जाणाºया लोकांना त्याच्यापासून दुरुन जावा, असे सांगत होते.