जत येथील लखन पाथरूट व संदीप सातपुते हे दोघे २२ जुलै रोजी एमएच १० डीपी ९४५४ या दुचाकीवरून जवळा (ता. सांगोला) येथे आले होते. तेथून काम आटोपून रात्री ८ च्या सुमारास ते दोघे जण सदर दुचाकीवरून परत निघाले होते. दुचाकी हा संदीप सातपुते चालवत होता, तर लखन पात्ररूट पाठीमागे बसला होता. त्यांची भरधाव दुचाकी बुरुंगेवाडी गावाच्या हद्दीतील रोडवर मोठ्या खड्ड्यात आदळून हा अपघात झाला. यामध्ये लखन पाथरूट डोक्याला गंभीर मार लागल्याने बेशुद्ध पडला होता, तर संदीप सातपुते याचा हात फ्रॅक्चर झाला होता. बेशुद्ध अवस्थेतील लखन पाथरूट याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २४ जुलै रोजी मृत्यू झाला. अपघात मित्र संदीप सातपुते याच्या चुकीमुळे झाला म्हणून लखनची पत्नी रेणुका पाथरूट हिने फिर्याद दाखल केली आहे.
अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान सांगलीच्या रुग्णालयात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:26 AM