राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे ५२ वर्षं राज्य व देशाच्या कायदेमंडळात कार्य केलेले एकमेव नेते आहेत. शरद पवार यांनी १२ डिसेंबर रोजी ८१व्या वर्षात पदार्पण केले. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे या संस्थेच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विनंतीने संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया व सहकाऱ्यांतर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई संस्थेला खासदार शरद पवार यांचे राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ३० मार्च २०१७ रोजी पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारतानाचे तैलचित्र भेट देण्यात आले.
श्रीपूर येथील चेतन भोसले यांच्या तैलचित्राचे कौतुक खा. शरद पवार केले, तर चित्राने सर्वांचे लक्ष वेधले. श्रीपूरमधून शाळेचे शिक्षण घेऊन करिअरसाठी पुणे येथे गेला. अंगी असलेल्या चित्रकलेत चांगली प्रगती केली. चेतन भोसले हा एक चांगला चित्रकार आहे, ही वार्ता शरद कला, क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांना समजली. त्यांनी बोलावून घेऊन खा. पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिमा बनवून घेतली. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांना देशातील मानाचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असल्याचा फोटो दिसला व तत्काळ ही प्रतिमा साकारून देण्याचे ठरविले.
कोट :::::::::::::::::::::::
शरद पवार यांचे केलेले तैलचित्र हे जवळपास शंभर वर्ष टिकू शकेल. त्याला वापरलेले सर्व कलर इम्पोर्ट केले आहेत. ४५ दिवसांची मेहनत घेऊन ७.५ बाय १० फूट आकाराची प्रतिमा तयार केली आहे.
- चेतन भोसले,
चित्रकार