कुसळंब : उकाडा जाणवत असल्याने दरवाजा उघडा ठेवून झोपी जाणे चिखर्डेतील एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी उघडा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावली आणि बेडरुममधील कपाटातून १२ हजारांची रोकड आणि २ लाख १५ हजारांचे दागिने पळविले. या घटनेने चिखर्डेत खळबळ उडाली आहे.
ही घटना गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत समीर इमाम शेख ( वय ३६) यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस सुत्रांकडील माहितीनुसार १४ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता जेवण आटोपून शेख हॉलमध्ये झोपी गेले होते. उकाडा जाणवू लागल्याने हॉलचा दरवाजा उघडा ठेवून झोपी गेले होते. पहाटे ५.४५ वाजता शेख यांना जाग आली आणि त्यांना हॉलचा दरवाजा बंद दिसला. तसेच बाहेरून कोणीतरी कडी लावल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी लागलीच वडिलांना फोन करून याची माहिती दिली. त्यांनी कडी काढली आणि बेडरूममध्ये डोकावले असता चोरट्यांनी कपाट फाेडून रोकडसह दागिने पळविल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत.
------
राणीहार, नेकलेससह दागिन्यांवर मारला हात
चोरट्यांनी साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले निदर्शनास आले. तीन तोळ्यांचा राणीहार, दीड तोळे नेकलेस, दीड तोळे गलसर, सात ग्रॅम सोन्याचे गंठण, दोन भार चांदीचे पैंजण, चार भार चांदीचे कडे व रोख रक्कम बारा हजार पाचशे रुपये असा ऐवज पळवला. चोरट्यांनी साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले निदर्शनास आले. तीन तोळ्यांचे राणीहार, दीड तोळे नेकलेस, दीड तोळे गलसर, सात ग्रॅम सोन्याचे गंठण, दोन भार चांदीचे पैंजण, चार भार चांदीचे कडे व रोख रक्कम बारा हजार पाचशे रुपये असा ऐवज पळविला.