दीड वर्षापासून शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो व इतर पिकांना कोरोनामुळे भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
सुस्ते (ता. पंढरपूर) येथील भारत चव्हाण यांनी एप्रिलमध्ये तीस गुंठ्यात शुगर किंग व हॅपी फॅमिली या कलिंगडाच्या जातीची लागवड केली. यासाठी लागवडीपासून ते पूर्ण पीक हातात येईपर्यंत ७० हजार रुपये खर्च करून एक कलिंगड सात ते आठ किलो वजनाचे असून १० ते १५ टन कलिंगडापासून तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यामुळे बाजारपेठ बंद असल्याने कलिंगड विक्रीअभावी मातीत गाडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
कोट :::::::::::::::::::::::::::::::
कलिंगडाच्या पिकासाठी ७० हजार रुपये खर्च केले. हातातोंडाशी आलेले कलिंगडाचे पीक कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी केलेल्या लाॅकडाऊनने बाजारपेठेअभावी मातीत गाडण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला सरकारने हमीभाव दिला पाहिजे.
- भारत चव्हाण
शेतकरी, सुस्ते
फोटो :::::::::::::::::::::::
सुस्ते (ता. पंढरपूर) येथील भारत चव्हाण यांच्या शेतात जागेवर सडून चालेला कलिंगडाचा फड.