शेळवे (ता. पंढरपूर) येथील एका नागरिकाने ३ मे रोजी शेतजमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर नोंद लावल्याबद्दल बक्षीस म्हणून व याच जमिनीवरील बँकेचा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी ज्ञानेश्वर साळुंखे यांनी एक हजार रुपयांची मागणी करीत शेळवे गावातील बसस्टॉपजवळ लाच स्वीकारली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित तलाठी व मदतनीस ज्ञानेश्वर साळुंखे यांची चौकशी केली. यानंतर ज्ञानेश्वर साळुंखे याच्या विरोधात फिर्याद दिल्याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संजीव पाटील, अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, अर्चना स्वामी, प्रफुल्ल जानराव, स्वप्नील सणके, शाम सुरवसे यांनी ही कारवाई केली.
----