मंद्रुप : १२ दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीने गुरुवारी पुन्हा जबाब बदलला़ तिने दिलेल्या जबाबानुसार अपहरण करून अत्याचार केल्याचा गुन्हा मंद्रुप पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. तिच्या जबाबानुसार पोलिसांनीही तपासाची दिशा बदलली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केली होती़ चार दिवसानंतर ही मुलगी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाली़ मला कुणीही पळवून नेले नव्हते, मला पसंत नसलेल्या मुलाबरोबर लग्न लावणार असल्याने आई-वडिलावर नाराज होऊन मी दुसºया गावात नातेवाईकांकडे गेले होते, असा जबाब या मुलीने दिला होता़ कुटुंबीयांना तो मान्य नव्हता, त्यामुळे तिला घरी नेण्यास त्यांनी साफ नकार दिला़ त्यानंतर या मुलीची रवानगी बाल निरीक्षणगृहात केली.
दुसºया दिवशी या मुलीची आजी स्वत: मंद्रुप पोलीस ठाण्यात हजर झाली़ तिने आपल्याकडे मुलगी आली नव्हती, ती खोटे बोलत असल्याचे सांगितले़ तक्रारीनुसार मुलीची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, परंतु मुलीने त्याला प्रतिसाद दिला नाही़ त्यानंतर तिची रवानगी पुन्हा बाल निरीक्षणगृहात केली.
पोलिसांनी दुसºयांदा मुलीचा जबाब घेताना तिने पहिला दिलेला जबाब बदलला़ लग्नाचे आमिष दाखवून आपले अपहरण करण्यात आले़ त्यानंतर अत्याचार केला असा जबाब पोलिसांना दिला. वैद्यकीय चाचणीही करून घेतली़ नव्या जबाबानुसार दोघांवर अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे़ तपास फौजदार गणेश पिंगुवाले हे करीत आहेत.