यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील, उद्धव माळी, तानाजी झोळ, अमर गादिया आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. शिंदे म्हणाले की, मी कायमच प्रत्येक काम व सामाजिक अडचण ही शाश्वत स्वरूपात सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतो. दहिगाव उपसा सिंचन योजना मी पूर्ण क्षमतेने चालू केली. उरलेली कामे लवकरच मार्गी लावणार आहे. या परिसरातील रस्ते, वीज ही कामे प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आ. शिंदे यांनी जेऊर ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते उमेश पाथ्रूडकर यांची व प्रतिष्ठित व्यापारी अभय लुंकड तसेच निखिल मोरे यांची भेट घेऊन चर्चा केल्याने जेऊर गावातील राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी नितीन खटके, संजय गुटाळ, विष्णू माने, अण्णासाहेब निमगिरे, रामभाऊ घोरपडे, शहाजी कोंडलकर, अतुल निर्मळ, अमित संचेती, समीर केसकर, पांडुरंग घाडगे, सत्यम सूर्यवंशी, उत्तम शेळके, आजिनाथ माने, करचे, बाबू शिंदे, राहुल रासकर, राजेंद्र वेदपाठक, दिनेश घाडगे, महेश कांडेकर, सागर लोंढे, शिवम सूूर्यवंशी, लतेश घनवट, महावीर जाधव, दत्ता जाधव, सुभाष जगताप, अजित उपाध्ये, महादेव कुंभार, विष्णू शिरस्कर आदी जेऊर परिसरातील मंडळी उपस्थित होती.
१३करमाळा-जेऊर
आ.संजयमामा शिंदे यांचे जेऊर येथे वागत करताना ग्रामस्थ व कार्यकर्ते.