गेल्या काही दिवसांपासून नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. वीर धरणात २१ जुलै रोजी ४३.७० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतीला संजीवनी मिळणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नीरा उजवा कालवा, नदीपात्राच्या कडेला पाणीसाठ्यात पाणी जमा होत असून पाणीपातळीत वाढ होणार आहे.
चालू हंगामातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, फळपिकांना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हजारो एकर शेतीला फायदा होणार आहे. या नदीवर बांधलेले बंधारे पाणी टिकून राहण्यास मदत होणार आहे. नीरा खोऱ्यातील धरणे भरत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला, सातारा जिल्ह्यातील फलटण व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
भाटघर पाणीसाठा
पाणी पातळी ६२३.२८ मी.
एकूण साठा ६२०.८५ द.ल.घ.मी.
उपयुक्त साठा ६०९.९४ द.ल.घ.मी.
टक्केवारी ३०.५६ टक्के
गतवर्षी टक्केवारी ३६.८७ टक्के
उपयुक्त साठा २३.५० टीएमसी.
वीर धरण पाणीसाठा
पाणी पातळी ५७९.८५ मी.
एकूण साठा ५७१.६२ द.ल.घ.मी.
उपयुक्त साठा ५७३.८८ द.ल.घ.मी.
टक्केवारी ४३.७० टक्के
गतवर्षी टक्केवारी ३८.८८ टक्के
उपयुक्त साठा ९.४१ टीएमसी
निरा देवधर पाणीसाठा
पाणी पातळी ६६७.१० मी.
एकूण साठा ६६२.१० द.ल.घ.मी.
उपयुक्त साठा ६५०.३० द.ल.घ.मी.
टक्केवारी ३९.७१ टक्के
गतवर्षी टक्केवारी २२.५७ टक्के
उपयुक्त साठा ११.७३ टीएमसी