मंगळवेढा येथील महिला हॉस्पिटल अँड मल्टिस्पेशालिटीच्या ऑक्सिजन निर्मिती प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आ. प्रशांत परिचारक, भाजपचे शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, माजी झेडपी सदस्य शिवानंद पाटील, औदुंबर वाडदेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. पद्माकर अहिरे, डॉ. पुष्पांजली शिंदे आदी उपस्थित होते.
सध्या कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त ग्रामीण भागातील रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळावेत, या हेतूने महिला हॉस्पिटल अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण सोलापूरची एक प्रकारे आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल होताना दिसून येत आहे. या हॉस्पिटलने ही गरज ओळखून ज्या पेशंटना ऑक्सिजनची गरज होती अशासाठी २० बेड व ५ व्हेंटिलेटर बेडची सोय केली होती. आणखी त्यात वाढ करण्यासाठी या प्लान्टची उभारणी केल्यामुळे आणखी काही बेड उपलब्ध होणार आहेत, असे आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.
फोटो ओळी ::::::::::::::::::
महिला हॉस्पिटल येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांट उद्घाटनप्रसंगी आ. समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक, डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. पुष्पांजली शिंदे आदी.