पुण्या-मुंबईकडे असलेल्या मंडळींना अगोदरच फोनाफोनीने पॅक केलंय. आता मतदानासाठी त्यांनी यावं म्हणून काहींना वाहनं पाठवून देण्याचं कबूल केलंय. काहींनी त्यांना फोन पे, गुगल पेद्वारे पैसे ट्रान्सफर करून ‘पाव्हणं तुमीच या वाहन करून’ असा प्रेमाचा सल्ला दिलाय. पारावर चकाट्या पिटणारी पोरंही या गोंधळात हात धुवून घेऊन लागलीत. नुसतं धुमशान सुरू आहे. कुणाचं काय तर कुणाचं काय.. जो तो आपापल्या परीनं या निवडणुकीकडं बघू लागलाय.
मंडळी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आता खरा रंग भरलाय.. वाजंत्री तयार आहे.. आवंदा बार उडवायचाच चाणाक्ष मतदारांचं सर्वांना व्हय म्हणणं बघून अधूनमधून उमेदवारांच्या काळजाचं ठोका चुकू लागलाय. मग इतरांच्या आडून ‘मागं मागं वळून काय बघताय वो पाव्हणं इचार काय हाय तुमचा, साखरपेरणी सुरूय.
- इल्लूभाई
----