अध्यातम ; वास्तुशास्त्र, फेंग-शुईनुसार प्रसिद्ध गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:44 AM2018-09-15T10:44:42+5:302018-09-15T10:51:15+5:30

प्रसिद्ध गणेश मंडळे की जी नवसाला पावणारी म्हणून ओळखली जातात. त्यांचा वास्तुशास्त्रानुसार रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया.

The highest; Vastu Shastra, Famous Ganesha according to Feng Shui | अध्यातम ; वास्तुशास्त्र, फेंग-शुईनुसार प्रसिद्ध गणपती

अध्यातम ; वास्तुशास्त्र, फेंग-शुईनुसार प्रसिद्ध गणपती

googlenewsNext
ठळक मुद्देफेंग-शुईनुसार समोरील मोकळ्या जागेस लाल फिनिक्स असे म्हणतातमोकळी जागा जितकी लांब तितके चांगले जितकी मोठी दूरदृष्टी तितकी प्रगती, समृद्धी प्राप्त होते

आज आपण महाराष्टÑातील प्रसिद्ध गणेश मंडळे की जी नवसाला पावणारी म्हणून ओळखली जातात. त्यांचा वास्तुशास्त्रानुसार रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया.

मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार गणपतीच्या मूर्तीचे मुख एकतर पूर्वेस तोंड करून हवे, अथवा पश्चिमेस तोंड करून हवे. मुंबईचा लालबागचा राजा, पुण्याचा दगडूशेठ गणपती, सोलापूरचा आजोबा गणपती व कित्येक प्रसिद्ध गणपती हे सर्व या नियमात बसतात. हा इतका साधा नियम अनेक मंडळांना ठाऊक नाही, याचे वाईट वाटते. असो, जर आपल्या मंडळाचा किंवा घरातीलही गणपती जर दक्षिण-उत्तर बसवला असेल तर पुढील वेळेस तो पूर्व-पश्चिम बसवावा.

फेंग-शुईच्या सिद्धांतानुसार (फेंग-शुई हे भले चीनमधून आलेले आहे, पण यातील अनेक नियमांचा वापर आपले प्राचीन राज्यकर्ते करीत होते म्हणजे मूलत: हे आपलेच शास्त्र आहे.) आपल्या पाठीमागे मजबूत आधार असणे हे प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असते. त्यास ‘काळ्या कासवाची’ उपमा आहे.

फेंग-शुईनुसार समोरील मोकळ्या जागेस लाल फिनिक्स (फिनिक्स एक काल्पनिक पक्षी जो राखेतून निर्माण होतो.) असे म्हणतात. ही मोकळी जागा जितकी लांब तितके चांगले. तेवढी उत्तम दूरदृष्टी निर्माण होते व जितकी मोठी दूरदृष्टी तितकी प्रगती, समृद्धी प्राप्त होते. सर्वात उत्तम लाल फिनिक्स मिळाला आहे तो लालबागच्या राजास. या गणेश मूर्तीसमोर लांब व सरळ असा रस्ता आहे.
वास्तू व फेंग-शुईनुसार आपल्यासमोरील डावी बाजू ही जलतत्त्वाची तर उजवी बाजू ही अग्नितत्त्वाची असते. या तत्त्वांशी संबंधित गोष्टी मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूस असतील तर अशा ठिकाणी इच्छापूर्ती होणे म्हणजे मागितलेला नवस पूर्ण होणे, असे अनुभव येतात. चांदी हा धातू जलतत्त्वाशी संबंधित आहे आणि याच धातूच्या आवरणातील चांदीचा उंदीर लालबागच्या राजाच्या, आजोबा गणपतीच्या डाव्या बाजूस आहे, जो जलतत्त्वास जागृत करून भक्तांची इच्छापूर्ती करण्यास मदत करत आहे.

सोलापूरच्या आजोबा गणपती  मंदिराच्या बाहेरील उजव्या बाजूस (समोर) असलेला एमएसईबीचा इलेक्ट्रिकल ट्रान्स्फॉर्मर हा अग्नितत्त्वाचा निदर्शक आहे.  लालबागचा राजाच्या सिंहासनाच्या डाव्या व उजव्या बाजूस खाली निर्माण केलेल्या (कधी सिंहासारख्या तर कधी असुरासारख्या) प्रतिमा, आजोबा गणपतीच्या सिंहासनावरील सिंहप्रतिमा या फेंग-शुईनुसार वाईट शक्तींना रोखणाºया असतात. अशाच सिंहप्रतिमा शिर्डीच्या साईबाबाच्या सिंहासनावर व पूर्वीच्या कित्येक मंदिरात आपल्याला दिसतात. या प्रतिमांचा प्रभाव आपल्यासमोर दिसतोच आहे. दहशतवाद्यांच्या इतक्या असुरक्षित अशा वातावरणातसुद्धा  लाखो भाविक तहान-भूक विसरून             २४-२४ तास व कधी कधी त्याहून जास्त वेळ रांगेत उभे राहून सुरक्षितपणे दर्शन घेतात, नवस फेडतात हा चमत्कार नव्हे काय.
                                                                                                                                                                     - प्रशांत महिंद्रकर

Web Title: The highest; Vastu Shastra, Famous Ganesha according to Feng Shui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.